Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विकास शिक्षण मंडळ चिंचवड संचलित शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीना सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.2 सप्टेंबर 2024 रोजी विद्यालयात माध्यमिक विभागातील मुलींना सुरक्षेबाबत मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते इ 9 वी ते 12 वी च्या विदयार्थ्यांनी यात उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला.

प्रमुख मार्गदर्शक डॉ भाग्यश्री लहाने( मुंडे ),डॉ सीमा तळेले (भापकर)  महानंदा मुंडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शनात डॉक्टर मुंडे यांनी विद्यार्थिनींना विद्यार्थी सुरक्षा समिती अंतर्गत शासनाने सुचविलेल्या गुड टच बॅड टच म्हणजे काय? चांगल्या सवयी आत्मसात करणे किती गरजेचे आहे.उत्तम आरोग्य कसे ठेवावेत , सकस आहार कसा घ्यावा याबद्दल विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन केले.या बद्दल संस्थेचे अध्यक्ष  जगदीश  जाधव सचिव  संजय  जाधव यांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थेचे संचालक  विजय जाधव प्राचार्य  बाळाराम पाटील, प्राथ मुख्याध्यापक  साहेबराव देवरे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उप मुख्याध्यापक सौ सुषमा संधान कोअर कमिटी सदस्य  मनीषा जाधव शब्बीर मोमीन इ सर्व शिक्षक उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version