प्रत्येक शाळेमध्ये महिला सुरक्षा कार्यक्रम घ्या – मेघराज लोखंडे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कोणत्याही अल्पवयीन मुलीवर कुठल्याही प्रकारचे अत्याचार पुढे होऊ नये.प्रत्येक शाळेमध्ये महिला सुरक्षा कार्यक्रम”नारी शक्तीचा इतिहास लिहा, दुर्व्यवहाराच्या विरोधात उभे रहा.” घेण्यात यावे तसेच प्रत्येक खाजगी रिक्षा चालकाचे पोलीस रेकॉर्ड तपासणी हे बंधनकारक करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिं-चिं शहर ( जिल्हा ) जिल्हा सरचिटणीस मेघराज लोखंडे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील विद्यालयातील मुली सुरक्षित नाहीत. त्यांना संरक्षण मिळावे यासाठी शाळेत , विद्यालयात महिला सुरक्षा धडे द्यावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. क कोणत्याही अल्पवयीन मुलीवर कुठल्याही प्रकारचे अत्याचार पुढे होऊ नये..! प्रत्येक शाळेमध्ये महिला सुरक्षा कार्यक्रम”नारी शक्तीचा इतिहास लिहा, दुर्व्यवहाराच्या विरोधात उभे रहा..!!” घेण्यात यावे तसेच प्रत्येक खाजगी रिक्षा चालकाचे पोलीस रेकॉर्ड तपासणी हे बंधनकारक करावे..! अशी मागणी करुन निवेदन देण्यात आले. यावेळी प्राजक्ता रणजीत बागडी, सौरभ भोसले व इत्तर पदाधिकारी उपस्थित होते.













