ताज्या घडामोडीपिंपरी
पिंपरी येथील सिंधी बांधवानी साजरा केला मातृ पितृ दिन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील शनी मंदिराजवळ मातृ पितृ दिन काल (दिनांक १४ फेब्रुवारी) साजरा करण्यात आला.
भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा संस्कार म्हणजे आई वडीलांच्या प्रती मुलगा असो मुलगी संवेदना प्रगट करण्याची पारंपरिक पद्धत आहे आणि तो दिवस असतो १४ फेब्रुवारी या वर्षी पिंपरी येथील सिंधी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला.
या वेळी मनोहर जेठवानी, तुलसीदास तलरेजा, ज्योती मुलचंदानी, कविता बुलानी,रिता बुलानी,जानकी सावदा,रानी दुसेजा आरती बनमोथा, शैलजा पेंडलवाल,बरखा वनवारी,होरो अटवानी, दिनेश वलेचा सुरिंदर मंघवानी, घनश्याम पोपटानी आदी मान्यवर उपस्थित होते













