ताज्या घडामोडीपिंपरी

१ हजार १९० सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन;  आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत डूडूळगाव येथे १ हजार १९० सदनिका उभारण्यात येत आहेत. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील रहिवाशी असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र लाभार्थ्यांकडून ३० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी महापालिकेकडे ऑनलाईन  पद्दतीने अर्ज सादर करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

           केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत डुडुळगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधणे प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतील सदनिकांकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवाशी असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात येणाऱ्या नागरिकांकडून दि.३० ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२४ पासून मागविण्यात येत आहेत. महापालिकेकडे ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जांची छाणणी करुन लाभार्थी निश्चित करण्यात येणार असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.  योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना अटी व शर्ती पूर्तता करणे आवश्यक आहे  

या योजनेसाठी घेण्यासाठी नागरिकांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रहिवाशी नागरिक या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करु शकतात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाअंतर्गत येणा‌ऱ्या अर्जदारांचा कुंटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपर्यंत असावे,  अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींचा नावे भारतात कुठेही घर अथवा मिळकत नसावी, पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत यापुर्वी च-होली, रावेत, बो-हाडेवाडी, पिंपरी व आकुर्डी येथील प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या परंतु, सदनिका प्राप्त न झालेल्या व प्रतिक्षा यादीमधील नागरिक नव्याने अर्ज करु शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button