चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

१०० व्या मराठी नाट्य नाट्यसंमेलनात ‘जोडी तुझी माझी’ ही रंगतदार मुलाखत

Spread the love

 

पिंपरी(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ऐतिहासिक १०० व्या नाट्य संमेलनात रविवारी ग. दि. मा.नाट्यगृह येथे ज्येष्ठ अभिनेते व लेखक संजय मोने, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने तसेच झिम्मा या चित्रपटामुळे चर्चेत आलेली जोडी अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे, निर्माती व अभिनेत्री क्षिति जोग या दोन जोड्यांचा समावेश असणारा मुलाखतीचा कार्यक्रम रंगतदार झाला. मुलाखतकार श्रीकांत चौगुले यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

अभिनेते संजय मोने यांच्या बेधडक आणि उत्स्फूर्त उत्तरांनी मुलाखतीत अधिक रंगत आणली. मराठी भाषा आणि मराठी नाटक याविषयी चिंतन मांडताना मोने यांनी सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली. चांगली संहिता, चांगले दिग्दर्शन, चांगले कलाकार आणि प्रेक्षकांची उत्तम जाण. यावरच भविष्यकाळातील नाटक अवलंबून असल्याचे मोने यांनी सांगितले.
क्षिति जोग यांनी आजी शांताबाई जोग यांच्या पासूनचा अभिनयाचा वारसा उलघडताना अनेक घटना प्रसंग आणि आठवणी सांगितल्या.

सुकन्या कुलकर्णी यांनी संजय मोने यांचा कलंदरपणा, अगदी मध्यरात्री प्रपोज करणे. अगदी स्त्रियांच्या कपड्यात वावरणे अशा आठवणी जागवल्या. तसेच दोन वेळा झालेला अपघात, त्यातून खंबीरपणे केलेली वाटचाल, अपंगत्वावर मात करून वयाच्या पन्नासाव्या वर्षी भरत नाट्यममधील अरंगेत्रम पूर्ण केल्याचे सांगितले. नाटकाबरोबरच चित्रपटातील भूमिका आणि एकमेकांच्या नात्यातील नाजूक बंध त्यांनी उघडले. हेमंत ढोमे यांनी कलेचा कसलाही वारसा नसताना केलेली वाटचाल आणि त्यातून मिळालेले यश उलगडताना झिम्मा चित्रपटाचे काही अनुभव सांगितले. तसेच एकाच क्षेत्रातील पति, पत्नी असतील तर त्याचा लाभ दोघांनाही होतो. एकमेकांच्या गरजा कळतात असे मत मांडले आणि व क्षितीच्या मदतीचे काही किस्से त्यांनी सांगितले. दोन्ही जोड्यांच्या एकमेकांच्या आठवणी, उत्स्फूर्तपणे केलेली मार्मिक टिप्पणी, यामुळे प्रेक्षक हास्यरसात चिंब झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी नाट्यपरिषदेच्या वतीने समीर हंपी यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
mr Marathi