चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी
१००व्या नाट्यसंमेलनाचे उद्या भूमी पूजन व मंडप पूजन समारंभ

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – १००व्या नाट्यसंमेलनाचे बिगुल वाजले असून, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या माध्यमातून शहरामध्ये तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे.
दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी चिंचवडगाव, मोरया गोसावी क्रीडा संकुल, काकडे पार्क, चिंचवडगांव येथे भूमीपूजन व मंडपपूजन समारंभ होणार आहे. सकाळी ठीक ११ वाजता मंगलमूर्तीवाड्यामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले व उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते आरती करून सुरुवात होणार आहे. वाहन रॅलीच्या माध्यमातून सर्व उपस्थित मोरया गोसावी क्रीडा संकुल, काकडे पार्क,चिंचवडगांव येथे पोहोचतील व ठीक ११:३० वाजता भूमी पूजन व मंडपं पूजन समारंभ संपन्न होईल.













