हिरो मोटो क्रोप कंपनीच्या सी एस आर फंडातून शालेय विद्यार्थ्यांना मोफत हेल्मेट वाटप

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिरो मोटो क्रोप कंपनीच्या सी एस आर फंडातून शनिवार दिनांक २०फेब्रुवारी 2024 रोजी या ठिकाणी सुमारे ३५० हेल्मेट आठ वर्षाखालील शालेय विद्यार्थ्यांना मोफत वाटप कार्यक्रम आज संपन्न झाला .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अनिल वळीव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे प्रमुख पाहुणे म्हणून आरती चव्हाण सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पुणे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ३५० शालेय विद्यार्थ्यांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन द हेड इंजुरी फाउंडेशन नवी दिल्ली व सेफ इंडिया ओरिसा यांच्या माध्यमातून करण्यात आले. या उपक्रमाची संपूर्ण जबाबदारी मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी घेतली होती .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार जाधव सुरज देवकर या राजू घाटोळे अध्यक्ष मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली सदर कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शालेय विद्यार्थी शालेय विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. हेल्मेट चे महत्त्व लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन हेल्मेट वाटप उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन जवाहर इंग्लिश मीडियम स्कूल गणेश पेठ शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता मोहिते यांनी सदर प्रसंगी बोलताना केले.









