ताज्या घडामोडीपिंपरी
हिंद कामगार संघटनेच्या नोंदणीकृत बांधकाम कामगार सभासदांना संसार भांडे किट वाटप

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंद कामगार संघटनेच्या नोंदणीकृत बांधकाम कामगार सभासदांना संसार भांडे किट वाटप करण्यात आले. तसेच बांधकाम कामगारांची रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कामगारांना माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
निर्मला सद्गुरू कदम यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना संसार किट वाटप करण्यात आले.
यावेळी संघटनेचे शितल सिकंदर, पुष्पा सितापराव, सविता भावके, दत्ता पवार, फिलिप सिकंदर, रविंद्र कांबळे आदी उपस्थित होते.













