स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा काळभोर नगर प्राधिकरण अग्निशमन विभागाकडून घेण्यात आली मॉकड्रिल

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा काळभोर नगर येथे आपत्कालीन परिस्थिती पूर्वतयारीच्या अनुषंगाने मॉकड्रिल घेण्यात आली.
अग्निशमन विभागाकडून दरवर्षी 14एप्रिल ते 21एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने अग्निशमन विभागाकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रहिवासी इमारती, मॉल, सामान्य लोकांचे आवागमन क्षेत्र आदी. ठिकाणी आपत्कालीन व आगीच्या प्रसंगाची पूर्वतयारी म्हणुन मॉकड्रिल आयोजित केली जाते.
दि-18/04/24 रोजी स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा काळभोर नगर येथे अग्निशमन विभागाकडून आपत्कालीन परिस्थितीची पूर्वतयारी म्हणून मॉकड्रिल घेण्यात आली आहे.
आपत्कालीन परिस्थितीवर मात करतेवेळी काय केले पाहिजे याकरिता स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा काळभोर नगर व अग्निशमन दल यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्मचाऱ्यांना आगीच्या व विद्युत आणीबाणीच्या प्रसंगी शास्त्रीय पद्धतीने काय केले पाहिजे याची माहिती मॉकड्रिल घेऊन देण्यात आली.जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत योग्य तो समन्वय साधून परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल व वित्तहानी तसेच जीवितहानी होण्यापासून टाळता येईल.अग्निशमन विभागाकडून अग्निशमन उपकरणे यांचे हाताळणी प्रात्यक्षिके कर्मचारी यांच्या कडुन करून घेण्यात आली.
यावेळी सुमारे घटनास्थळी उपस्थित 10 शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी हे उपस्थित होते स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा काळभोर नगर येथील कर्मचारी यांना अग्नी सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
सदर मॉकड्रिल करते वेळी गौंतम इंगवले, सब ऑफिसर विकास नाईक,लिडींग फायरमन, गणेश घोरपडे (मे.वा.चा), दिपेश दिवेकर (T.F) , साहिल साळगावकर (T.F), श्री योगेश ढाले (T.F) यांचे समक्ष व सहकार्याने संदर्भीय मॉकड्रिल आयोजित करण्यात आली.













