स्वातंत्र्यवीर सावरकर : समज व गैरसमज या विषयावर पुण्यात मातंग साहित्य परिषदेच्या वतीने परिसंवाद

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मातंग साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘ स्वातंत्र्यवीर सावरकर : समज व गैरसमज ‘ या विषयावर पुण्यात विवेकवादी विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादाचे आयोजन मंगळवार दि.२५/०६/२०२४ रोजी सायं ५.००वा. भारतीय विचार साधनेचे सभागृह, भावे शाळेच्या पाटी मागे,पेरुगेट,टिळक रोड, पुणे येथे करण्यात आले आहे.
या परिसंवादात कन्नड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत डॉ.अंबादास सगट व पुणे येथील साहित्यिक व लेखक संदीप तापकीर हे वरील विषयावर भूमिक स्पष्ट करणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून हे मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड.विक्रमजी गायकवाड यांची उपस्थितीती लाभणार आहे. .याच कार्यक्रमात छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मातंग साहित्य परिषद पुणे चे संस्थापक/अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे यांनी केले आहे.













