सोलापूर येथे झालेल्या शासकीय विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनींनी केली चमकदार कामगिरी

सोलापूर येथे झालेल्या शासकीय विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनींनी चमकदार कामगिरी केली.
सोलापूर येथे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागीय किकबॉक्सिंग स्पर्धा सोलापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये
चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी किक बॉक्सिंग या प्रकारामध्ये – 55 किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी केली व तिची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली.
निवड झालेले विद्यार्थी.
विभागीय किक बॉक्सिंग
1) कु गिरीजा शशिकांत माने प्रथम या विद्यार्थिनींनीने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव यांनी सर्व विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
प्राचार्य बाळाराम पाटील, मुख्याध्यापक प्राथमिक साहेबराव देवरे,पर्यवेक्षक श्री दत्तात्रय भालेराव, उपमुख्याध्यापक किसन अहिरे कमिटी मेंबर मनीषा जाधव सुषमा संधान, छाया ओव्हाळ, क्रीडा शिक्षक शब्बीर मोमीन यांनी पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.









