ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण
सिद्धेश पाटील याचे सायकलिंगमध्ये यश

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती या दरम्यान आयोजित सायकलिंग स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गातील सिद्धेश पाटील याने प्रथम क्रमांक मिळविला.
सन २०२२,२०२३ व २०२४ या सलग तीन वर्षात सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी हॅटट्रिक केली आहे. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर (डॉ.) माधव सरोदे, उपप्राचार्य डॉ. मृणालिनी शेखर, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. पांडुरंग लोहोटे, प्राध्यापक यांनी त्याचे अभिनंदन केले.













