Spread the love
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संभाजीनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात रविवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी “हॅलो सखी शिक्षक मंच” च्या वतीने स्वरगंध भक्तीसरगम प्रस्तुत दिवाळी पहाट चे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील विविध माध्यमिक मराठी शाळांमध्ये इंग्रजीचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा ” हॅलो सखी” हा मंच सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहे. संभाजीनगर येथील स्वा. सावरकर प्रतिष्ठान, स्वा. सावरकर मित्र मंडळ व सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने या दिवाळी पहाट चे आयोजन करण्यात आले आहे. राजगुरूनगर आयडॉल प्रदीप मोहिते हे प्रमुख गायक असून प्रकाश सुतार व कुडाळकर यांची साथसंगत आहे.
नागरिकांनी सदर दिवाळी पहाट कार्यक्रमांचा आस्वाद घेत दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, असे संयोजकांनी कळवले आहे…
Share.
Leave A Reply

Exit mobile version