ताज्या घडामोडीपिंपरी

सामाजिक उपक्रमांनी अभय भोर यांचा वाढदिवस साजरा

Spread the love

 

दिवसभर विविध मान्यवरांकडून अभिष्टचिंतन

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोशिएशनचे अध्यक्ष, उद्योजक अभय भोर यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच दिवसभर विविध मान्यवरांकडून भोर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

अभय भोर यांच्या भोसरी एमआयडीसी येथील जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले. उद्योजक, कामगार, तरुण, तरुणींनी या शिबिरात उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. तसेच एमआयडीसी भागात वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमात आणि कंपनीने सहभाग नोंदवून आपल्या बाहेरील बाजूस वृक्षारोपण केले. या वेळी २१ हजार वृक्षरोपांची लावगड करण्याचा संकल्प भोर यांनी केला तसेच महिला उद्योजकांना उत्पादनांना स्टार्टअप मध्ये काही कामचे वाटप करण्यात आले काही कंपन्यांच्या मध्ये लागणाऱ्या वस्तू पुरविण्याचे काम देण्यात आले. , या उपक्रमात नगरसेवक योगेश जी बहल , नगरसेविका शैलजा जी मोरे ,डी वाय पाटील वुमन्स कॉलेज प्रिन्सिपल श्री सुरेश धरने भोसरी पोलीस निरीक्षक श्री शिवाजी गवारे , डेक्कन मेकॅनिकल कंपनीचे मिलिंद काळे , प्रवीण चव्हाण, फोरमचे उपाध्यक्ष वैभव जगताप , उद्योजक चैतन्य शिरोळे उद्योजक शिवाजी पाटील सुजित मंडल, निरंजन मनवर, जबिंदर सिंघ ,मयूर जैस्वाल दुर्गा ब्रिगेड अध्यक्ष दुर्गा भोर उद्योजक कामगार बंधू तसेच युवा व युवती आणि बहुसंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button