ताज्या घडामोडीपिंपरी
सात अनधिकृत आरओ आणि २० एटीएम वॉटर प्लांट्सवर महापालिकेची कारवाई

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गिलियन बेरे सिंड्रोमचा (GBS) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खाजगी आरओ तसेच एटीएम वॉटर प्लांट्सची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेत आढळून आलेल्या आज अशा सात आरओ आणि वीस एटीएम वॉटर प्लांटसवर महापालिकेने कारवाई केली असून संबंधित चालकांना प्लांट तात्काळ बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती माहिती पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी दिली.













