ताज्या घडामोडीपिंपरी
साऊ ज्योति सामाजिक फाउंडेशनच्या वतीने प्रिया थोरात यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न गौरव पुरस्कार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साऊ ज्योति सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे यांचे वतीने कु. नवले लता अण्णा यांना प्रिया थोरात ( असिस्टंट कमिशनर पोलिस क्राइम ब्रांच मुंबई ) यांचे हस्ते राज्यस्तरीय शिक्षक रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवले मॅडम या सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर आकुर्डी पुणे 35. या शाळेत शिक्षिका म्हणून गेली 17 वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यासाठी त्यांना संस्थेचे संस्थापक सचिव गोविंदराव दाभाडे व मुख्याध्यापक श्री. माळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.













