सांगवी-रहाटणी मंडल महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

सांगवी-रहाटणी मंडल महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी सांगवी-रहाटणी मंडल महिला मोर्चाच्या कार्यकारिणीवर नवीन महिला पदाधिकाऱ्यांची आज निवड करण्यात आली. या नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना माझ्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. या सर्व महिला पदाधिकारी सांगवी-रहाटणी मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा शोभा नवनाथ जांभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम करणार आहेत.
त्यामध्ये चिंचवड विधानसभा महिला मोर्चा प्रमुखपदी कुंदा भिसे, सांगवी-रहाटणी मंडल महिला मोर्चा सरचिटणीसपदी पल्लवी दिलीप काशीद, प्रभाग क्रमांक २९ महिला मोर्चा अध्यक्षपदी वैशाली भरेकर, उपाध्यक्षपदी आशा टटले, प्रभाग क्रमांक ३१ महिला मोर्चा अध्यक्षपदी शितल आगरखेड, उपाध्यक्षपदी वैशाली जाधव, सचिवपदी रेखा दिनेश कदम, प्रभाग क्रमांक ३२ महिला मोर्चा अध्यक्षपदी दर्शना कुंभारकर यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व महिला भगिनींना नियुक्तीपत्र देऊन निवडीबाबत तसेच पक्ष संघटन वाढविण्याच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या.













