सांगवी दापोडी येथील दोन्ही भागांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील नवीन पुलाचे काम लवकर पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्यात यावा – नाना काटे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांगवी दापोडी येथील दोन्ही भागांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील नवीन पुलाचे काम अंतिम टप्यात असून ते लवकरात लवकर पूर्ण करून हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगवी व बोपोडी या दोन्ही भागांना जोडणाऱ्या मूळा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम हे पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून या पुलाचे काम ९५% पूर्ण झाले असून बाकीचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरात लवकर पूर्ण करून हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, हा पूल खुला केल्यास ब्रेमेन चौक, औंध रायेत आणि खडकी रोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांची वाहतुकीच्या त्रासातून सुटका होणार आहे, संयुक्त प्रयत्नातून राबविलेल्या या प्रकल्पाचा उद्देश महत्त्वाच्या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्याचा होता पुल बांधणीसाठी खर्च हा पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका दोन्ही महानगरपालिका मिळून ५०-५०% असा केला आहे. या पुलाची रुंदी चारपदरी रस्ता व पदपथासह १८ मीटर असून पुलाची लांबी ५४० मीटर (पुणे बाजू) ९५ मीटर (पिंपरी चिंचवड बाजू) अशी असून या पुलाच्या प्रकल्पाची किंमत ३२.६३ कोटी रुपये खर्चुन बांधण्यात आला असून पुलाचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पूर्ण केले असून. हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
सांगवी व बोपोडी या दोन्ही भागांना जोडणाऱ्या मूळा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून ते काम लवकरात लवकर पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा व नागरिकांची वाहतुकीच्या त्रासातून सुटका करण्यात यावी असे ही निवेदनात म्हटले आहे.













