सरस्वती भुवन इंग्लिश स्कूल पिंपळे गुरव या स्कूलला उत्कृष्ट स्कूल म्हणून इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – साई सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्यातर्फे इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार 2024 याचे आचार्य अत्रे सभागृह नेहरूनगर येथे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील एकूण 30 जणांना आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा व्यक्तीं व उत्कृष्ट संस्था यांना स्फूर्तीचिन्ह मेडल्स सर्टिफिकेट शॉल व श्रीफळ देऊन त्यांना प्रभाकर वाघेरे माजी उपमहापौर पिपरी चिचवड यांच्या हस्ते इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले. यांमध्ये सरस्वती भुवन इंग्लिश स्कूल पिंपळे गुरव या स्कूलला उत्कृष्ट स्कूल ने इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार 2024 ने गौरवण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका माया बायास व त्यांच्यासोबत स्कूल मधील शिक्षक वर्ग यांनी हा गौरव पुरस्कार अभिमानाने स्वीकारला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संदीप वाघेरे माजी नगरसेवक गोपाल देवांग आंतरराष्ट्रीय कोच व बॉक्सर छत्रपती अवॉर्ड विजेते व अर्जुन पुरस्कार विजेते मनीष आनंद माजी नगरसेवक बॉबी करनानी योगेश गोंधळे सन्मित्र बँक चेअरमन सुनील हिरूरकर असिस्टंट टू पोलीस कमिशनर ऑफ पिंपरी चिंचवड कर्नल महादेव घुगे जयंत हिरे आय सी आय सी आय बँक मॅनेजर नितू झा अर्चु मुकेश परूल गुप्ता हे होते माझी महापौर प्रभाकर वाघेरे यांनी आपल्या भाषणात सरस्वती भुवन इंग्लिश स्कूल कौतुक करत ही स्कूल एकमेव पिंपरी चिंचवड परिसरातील अशी स्कूल आहे की जे विद्यार्थी अभ्यासात कमी आहेत अशा विद्यार्थ्यांना तयार करून त्यांना या समाजात त्यांचे वेगळे स्थान निर्माण करत आहेत.
प्रत्येक वर्षी दहावीच्या परीक्षेत देखील या स्कूलच्या विद्यार्थी 100% रिझल्ट मिळवत आचर्य जनक कामगिरी करत असतात मला अभिमान वाटत आहे सन 2006 ते 2024 पर्यंत शाळेने सुमारे 3750 विद्यार्थी चांगले मार्गदर्शन देऊन घडवलेले आहेत की अशा स्कूलचा माझ्या हस्ते मी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करत आहेत सूत्रसंचालन ॲनेट गोंसाल्विस आभार प्रदर्शन फिरोज खान यांनी केले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या संस्थापिका जागृती धर्माधिकारी सेक्रेटरी राजेश मनाकांत मुख्याध्यापिका सीमा कांबळे, पर्यवेक्षक वैशाली दिंडाळ यांनी आयोजकांचे आभार मानत अभिनंदन व्यक्त केले













