सरकारचा निधी, तुमच्या हक्काचा निधी आणण्यासाठी तुमची साथ द्या – शिवाजीराव आढळराव पाटील

शिक्रापूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती शिवाजी महाराज पेठ शिक्रापूर येथील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ग्रामस्थांनी औक्षण करून स्वागत सत्कार केले. ग्रामदैवत श्री भैरवनाथ श्री जोगेश्वरी मंदिराच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, तुमची सर्वांची साथ मला खंबिरपणे लाभलेली आहे. या भागातला प्रत्येक व्यक्तीने आता विचार केला आहे की कुणाच्याही भावनेला बळी न पडता. आपले प्रश्न डोळ्यासमोर ठेऊन, आपल्या समस्या सोडवण्यासाठी कोणी काय केले हे लक्षात ठेऊन मतदान करणार आहे. सरकारचा निधी, तुमच्या हक्काचा निधी आणण्यासाठी मला तुमची साथ लागणार आहे.
रामभाऊ सासवडे शिवसेना तालुका प्रमुख – या गावातील ग्रामपंचायतचे इमारत बांधत असताना आलेले अडचणीच्या वेळेस शिवाजीराव पाटील दादा ठामपणे उभे होते. 7 हजाराचे लिड या गावातून देऊ शिरुर हवेलीचे लिड 1 लाखाच्यावर असणार आहे.
राष्ट्रवादी नेते दादा पाटील फराटे, भाजपा नेते राहुल दादा पाचर्णे, भाजप नेत्या जयश्री ताई पलांडे, जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे, पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, राष्ट्रवादी तालुकाप्रमुख रवी बापू काळे, भाजपा तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, तालुका अध्यक्ष महिला आरतीताई भुजबळ, उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, तालुकाप्रमुख शिवसेना रामभाऊ सासवडे, उप तालुका संघटक शिवसेना अश्विनी जाधव, भाजपा नेते राजू मांढरे, जिल्हा समन्वयक आनंदराव हजारे, तालुका संघटक दत्ता गिलगिले, ओबीसी जिल्हा प्रमुख कैलास नरके, शहर प्रमुख गणेश गायकवाड, सरपंच रमेश गडदे ग्रामपंचायत सदस्य शिक्रापूर कृष्णा गडदे, त्रिनयन कळमकर, प्रकाश वाबळे, उषा राऊत, सुवर्णा दिघे, पल्लवी हिरवे, भाग्यश्री गायकवाड, शालिनीताई राऊत आदि उपस्थित होते.












