संस्कृती संवर्धन व विकास महासंघाअंतर्गत चिंचवड विभागतील भजनी मंडळांचे आषाढ मासानिमित्त भजन

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संस्कृती संवर्धन व विकास महासंघाअंतर्गत चिंचवड विभागतील भजनी मंडळांचे भजन सादरीकरण आषाढ मासानिमित्त श्रीराम मंदिर, चिंचवडगाव येथे करण्यात आले. एकूण अठरा भजनी मंडळातील जवळपास २०० माता-भगिनींनी यात सहभाग घेतला.
सादरीकरणाअंतर्गत एक भजन व एक गवळण समाविष्ट होते. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन, प्रार्थनेने झाली प्रमुख मार्गदर्शनामध्ये उर्मिला अघोर यांनी भजन सेवेतुन भक्तीरसाचा अनुभव घेत परमेश्वराशी संवाद साधता येतो असे प्रतिपादन करत हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे असे अवाहन केले. भविष्यात शाळांमध्ये भजनी मंडळ तयार करण्याचा संकल्प घेवुया या विचारांसह डाॕ. अजित जगताप यांनी प्रस्तावना केली.
सादरीकरणामध्ये छान विविधता निर्माण करत भजनी मंडळांनी पंचपदी, गजर, अभंग व गवळण सादर करत शेवटी दिंडी सोहळा व रिंगण सोहळा सादर केला.विशेष म्हणजे साप्ताहिक आनंदवर्गाच्या बालचमुंनी सुद्धा भजन व गवळण सादर केली. भैरवी व पसायदानाने सांगता झाली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश भोईर, नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे, चंद्रकलाताई शेडगे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधुरी कवी, उज्वला कवडे, अंजली कुलकर्णी, सुषमा वैद्य, दिपाली खासनीस, हरिभाऊ क्षीरसागर व इतर कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. संस्कृति संवर्धन चे सचिव श्री. शिवानंद चौगुले यांनी आभार मानले.












