संस्कार प्रतिष्ठानची भाऊबीज सफाई कामगार महिलांसोबत

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका बिजलीनगर परिसरातील सफाई कामगार महिलांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली.
संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने मराठी अभिनेत्री रूपाली पाथरे यांच्या हस्ते ३५ महिलांना एक नवीन साडी आणि दिवाळी फराळाचे पाकीट भाऊबीज निमित्त भेट म्हणून देण्यात आली यावेळी महिलांनी संस्कार प्रतिष्ठानच्या सभासदांना ओवाळले. संस्कार प्रतिष्ठानचे हे सलग सफाई कामगार महिलांसोबत भावी साजरी करण्याचे सातवं वर्ष आहे. सफाई कामगार महिलांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. या कार्यक्रमाचे संयोजन
संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड सहाय्यक आरोग्य निरीक्षक सागर सणस, संजीत पद्मन, मीनाक्षी मेरूकर, कल्पना तळेकर, मोहिनी सूर्यवंशी, जयवंत सूर्यवंशी, विजय आगम, सुनिता गायकवाड, आनंद पाथरे,सायली सुर्वे, प्रीती चुडासामा,अनुषा पै, रोहित मोरे,मोहन पटाधारी, मनोज शिंदे,सचिन गोरगिले,मुकादम,सचिन तुपे कर्मचारी ऐश्वर्या शॅनल, सुनीता लोंढे, कौशल्या घोडके, सुनीता खुणे इत्यादींनी सहभाग घेतला होता













