ताज्या घडामोडीपिंपरी

संभाजी ब्रिगेडचे महापालिकेसमोर धरणे आंदोलन टीडीआर घोटाळ्या प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वाकडमधील कथित टीडीआर घोटाळ्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडने महापालिका मुख्यालयासमोर “धरणे आंदोलन” केले.यावेळी यात दोषी असणारे अधिकारी तसेच या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार प्रसाद गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.दरम्यान,संभाजी ब्रिगेड तसेच विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘प्रसाद गायकवाड यांची चौकशी झालीच पाहिजे, ‘ईडी’ने गुन्हा दाखल करून कारवाई करावी,टीडीआर घोटाळा म्हणजे भूखंडाचा श्रीखंड खाण्याचा प्रकार,नगर रचनाच्या सचिन वाझेवर कारवाई झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. टीडीआर घोटाळा प्रकरणी महापालिकेने लवकरात लवकर कारवाई करावी,अन्यथा पुढील काळात याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.यावेळी जनआंदोलन चळवळीचे नेते मानव कांबळे म्हणाले की, टीडीआर घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार प्रसाद गायकवाड यांच्यावर कारवाई का केली जात नाही?महापालिका प्रशासनाला भ्रष्ट अधिकारी पोसायचे आहेत का? देशाचे पंतप्रधान ‘ना खाऊंगा,ना खाने दुंगा’,अशी घोषणा देतात.मात्र,पिंपरी चिंचवड महापालिकेत त्याच्या उलट कारभार सुरू असून,राज्य सरकारच्या वरदहस्ताने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून डल्ला मारण्याचे काम सुरू आहे असे मानव कांबळे म्हणाले.

या वेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर,शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील,अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्धीक शेख,राजश्री शिरवळकर,समता सैनिक दलाचे मनोज गरबडे,आकाश इजगज,दीपक खैरनार,शिवशंकर उबाळे,शांताराम खुडे,गणेश रवींद्र चव्हाण,प्रल्हाद कांबळे,दिपक खैरनार,सुनिता शिंदे,कल्पना गिड्डे,माणिक शिंदे,दिलीप गावडे,या मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली,तसेच यावेळी सालार शेख,सुरेश भिसे,प्रकाश पठारे,जितेंद्र जुनेजा,राजश्री शिरवळकर,गणेश जगताप,संतोष शिंदे.रावसाहेब गंगाधरे,किरण खोत,तोशीफ शेख,सादिक शेख,
हाजीमलंग शेख,बापू गायकवाड,शहाबुद्दीन शेख या मान्यवरांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सतिश काळे,जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते कार्याध्यक्ष वैभव जाधव,उपाध्यक्ष नकुल भोईर,सचिव निरंजनसिंह सोखी,मावळ तालुका अध्यक्ष आदिनाथ मालपोटे इत्यादी पदाधिकार्यांनी नियोजन केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button