संचेती समुहाचा रुग्णांची सुरक्षितता वाढवण्यासाठी पुण्यातील पहिला “स्मार्ट वॉर्ड” कार्यक्रम सुरू करण्यासाठी संचेती हॉस्पिटल्सने डोझीसोबत केली भागीदारी

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – डोझीच्या साहाय्याने आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना हृदयाचे ठोके,रक्तदाब,एसपीओ2 पातळी,तापमान आणि ईसीजी यांसारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय बाबींवर दुरस्तपणे देखरेख ठेवता येईल.डोझीच्या अर्ली वॉर्निंग सिस्टिम (ईडब्ल्यूएस)च्या सहाय्याने या महत्त्वाच्या बाबींचे कल लक्षात घेऊन मागोवा ठेवतो येतो आणि रूग्णाच्या वैद्यकीय परिस्थितीत बिघाड झाल्यास आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना सूचना मिळून योग्य वेळेत गरजेनुसार हस्तक्षेप करता येतो.डोझी तर्फे एआय आधारित बॅलिस्टोकार्डिओग्राफी (बीसीजी) चा वापर केला जातो,ज्यामुळे कॉन्टॅक्टलेस मॉनिटरींग शक्य होते.डोझीच्या तंत्रज्ञानाला पेटंट प्राप्त झाले असून हे तंत्रज्ञान भारतात विकसित केले गेले आहे.या अभिनव तंत्रज्ञानाचा रूग्ण सुरक्षिततेवर,वैद्यकीय परिणामांवर आणि कामकाजाच्या कार्यक्षमतेवर लक्षणीय सकारात्मक प्रभाव पडतो.
संचेती समुहाचा रूग्णकेंद्रित दृष्टीकोन आणि स्मार्ट आणि शाश्वत आरोग्य सेवेसाठी कटिबध्दता ही अद्ययावत रूग्णसुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याच्या डोझीच्या ध्येयाशी सुसंगत आहे. या धोरणात्मक एकीकरणामुळे सतत देखरेख आणि योग्य वेळेत उपचार हे एक मानक प्रस्थापित होईल,ज्यामुळे परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होतील,असे मत डोझीचे भारतातील प्रमुख कौशल पांड्या यांनी सांगितले.
संचेती ग्रुप हे नैतिक पध्दती आणि विश्वासार्हता यासाठी ओळखले जाते आणि यामुळेच जागतिक दर्जाच्या आर्थोपेडिक सेवांमध्ये अग्रस्थानी आहे.डोझीच्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे या वचनबध्दतेला आणखी बळ मिळणार असून संचेतीचे स्थान रूग्ण व आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी शाश्वत व अभिनव पध्दतींचे ठिकाण म्हणून अधिक दृढ झाले आहे.









