चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

श्री संत तुकाराम महाराज व्यापार संकुलन व शिवतेज प्रतिष्ठान निगडी यांच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप

Spread the love

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त श्री संत तुकाराम महाराज व्यापार संकुलन व शिवतेज प्रतिष्ठान निगडी यांच्या वतीने आलेल्या सर्व वारकरी बंधू व भगिनिंचे स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला.

तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड प्रशासनाच्या वतीने आषाढी पालखी सोहळा 2024 करिता माहिती पुस्तिका प्रत्येक दिंडीस देण्यात आली, या पुस्तिकेमध्ये पालखी मार्गावर असलेल्या सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक पुरविण्यात आलेले आहेत.

या पुस्तिका वारीतील सर्वांच्या वाटचालीत विविध सुविधा उपलब्ध करून देतील. तसेच निगडी मध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे शहर संघटक संतोष सौंदणकर, शिवतेज प्रतिष्ठान अध्यक्ष सुरेश वाडकर, सुनील म्हासके, पिं.चिं. शहर सचिव ज्ञानेश्वर शिंदे, नुरबागवान शेठ, प्रफुल पोटफोडे, शैलेंद्र परंडवाल, पंडित दगडे, रघुनाथ शेट्टी, ओमप्रसाद परदेशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button