श्री गोंदवलेकर महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सेवा संप्रदाय, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने चिंचवड गावातील काशीधाम मंगल कार्यालयात गोंदवलेकर महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी ते रविवार दिनांक 9 फेब्रुवारी या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. पहिल्या दिवशी श्री महाराजांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली व श्रींची प्रतिष्ठापना केली.
या उत्सवात श्रीपाद बुवा अभ्यंकर, विलास बुवा गरवारे, चिन्मय बुवा देशपांडे, व श्रेयस बडवे यांची कीर्तन सेवा झाली तसेच मोहन बुवा रामदासी, चंद्रशेखर निलाखे, सोना बुवा रामदासी, यांची प्रवचने झाली. काकड आरती पंचपदी यासह दररोज सामुदायिक नामजप करण्यात येत होता. संगीत स्वरालय, गजानन महिला भजनी मंडळ, श्री रेवा भजनी मंडळ, वृंदावन भजनी मंडळ, चैतन्य सुधा भजनी मंडळ, वरद भजनी मंडळ, वैदेही भजनी मंडळ, श्री साई भजनी मंडळ, व श्रावणी भजनी मंडळ यांनी भजन सेवा केली.
यावेळी संजय उपाध्ये, राजाभाऊ गोलांडे, राजेंद्र गावडे, आशाताई सूर्यवंशी, व अपर्णा ताई डोके हे मान्यवर उपस्थित होते.
नीलकंठ दांडेकर यांच्या अधिपत्याखाली अवधूत कुलकर्णी, जितेंद्र कुलकर्णी, दिलीप पेशवे, शेखर हवेले, शरद इनामदार, रमेश कुलकर्णी, अश्विनी इनामदार, प्रशांत कुलकर्णी यांनी संयोजन केले













