शिवांजली सखी मंचच्या वतीने मोफत कायदा सल्ला केंद्राचे उदघाटन

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शिवांजली सखी मंच व चैतन्य प्रतिष्ठान पुणे, भारतीय जनता पार्टी कायदा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलां करिता हिराबाई किसनराव लांडगे
(आईसाहेब) मोफत कायदा सल्ला केंद्र याच उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते इंद्रायणी नगर, भोसरी या ठिकाणी करण्यात आले.तसेच पिंपरी चिंचवड शहर भागातील महिलांसाठी मोफत कायदा सल्ला केंद्र हे एडवोकेट विशाल विश्वास डोंगर(प्रदेश उपाध्यक्ष कायदा आघाडी महाराष्ट्र प्रदेश) यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आले.
या मोफत कायदा सल्ला केंद्रामध्ये महिलांना मोफत कायदे विषयक सल्ला मिळणार असल्याने महिलांचे मोठी सोय होणार आहे.
याप्रसंगी भोसरी सह पिंपरी चिंचवड शहरातील महिला भगिनींनी मोफत कायदा सल्ला केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले.
याप्रसंगी आमदार महेश दादा लांडगे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास भाऊ मडगिरे , योगेश लोंढे,नगरसेवक दिनेशयादव, ॲड विशाल डोंगरे, ॲड नवनाथ जगताप, ॲड पूनम डफळ , ॲड सोनाली नलगे, ॲड अनिल शिंदे, ॲड मंगेश खराबे , राजेश डोंगरे ,श्री शिवराज लांडगे, शिल्पा पवळ , धनश्री सारजे , वंदना वाघ , योगिता बनसोडे,भाग्यश्री दीडभाई, व इतर पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थिती होते.













