चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

शिवतेजनगरमध्ये रंगली सप्तसुरांची मैफल

Spread the love

 

शिवतेजनगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शिवतेजनगर येथील स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी “स्वर चांदण्याचे” या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक नामवंत कलाकारांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे, लक्ष्मण टक्केकर, शिवाजी साखरे, दीपक पाटील, जेष्ठ नागरिक महासंघाचे सचिव प्रा. हरि नारायण शेळके, राजू गुणवंत आदी मान्यवर उपस्थित होते. मधुगंधर्व संस्थेचे नंदिन सरीन यांच्या संकल्पनेतून आणि साहित्यिक राजेंद्र घावटे यांच्या समन्वयातून साकार झालेल्या कार्यक्रमात सुगम संगीत, भावसंगीत आणि भक्ती संगीतातून अभिरुचीपूर्ण संगीतमय फराळाचा आस्वाद रसिकांना घेता आला.
सूर नवा ध्यास नवा फेम अभयसिंह वाकचौरे, नंदिन सरीन, सी ए भूषण तोष्णीवाल, किशोरी सरीन, साहिल सारसर किरण बेंद्रे, विजया चव्हाण आदींनी गायन केले.

“सूर निरागस हो”, ” या जन्मावर या जगण्यावर”, ” माय भवानी तुझे लेकरू” , ” सूर तेच छेडीता”, “ऐरणीच्या देवा तुला”, ” धुंदी कळ्यांना”, ” हे फुलांनो चंद्र व्हा”, “ऐसी लागी लगन”, “मनाच्या धुंदीत” , “रेशमाच्या रेघानी” अशा वैविध्यपूर्ण गीतांना रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सिंथेसायझर व हार्मोनियम वादक प्रसाद कोठी, ख्यातनाम ढोलकीवादक विनायक वाघचौरे, तबला वादक सतीश काळे यांनी संगीत साज चढवला.
अनेक संदर्भ, दाखले , पंक्ती आणि शेर उद्रृत करत राजेंद्र घावटे यांनी कार्यक्रमाचे बहारदार निवेदन केले. त्यांच्या निवेदनाला रसिकांनी विशेष दाद दिली.
मुख्य संयोजक नारायण बहिरवाडे, राजू गुणवंत, प्रा. हरिनारायण शेळके, सारिका रिकामे, क्षमा काळे, अंजली देव यांनी कार्यक्रमाचे उत्तम रीत्या संयोजन केले. पारितोषिक प्राप्त गायक दिगंबर राणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सारिका रिकामे यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button