ताज्या घडामोडीपिंपरी
शाहू वाचनालयाच्यावतीने शिवरायांना अभिवादन

शाहूनगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शाहूनगर चिंचवड येथील श्री शाहू वाचनालयाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक भरत गायकवाड यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
छत्रपती शिवरायांच्या कार्याची माहिती उपस्थितांना सांगण्यात आली. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल, उपाध्यक्ष व व्याख्याते राजेंद्र घावटे, सचिव राजाराम वंजारी, खजिनदार राजेंद्र पगारे, ग्रंथपाल अनिता पाटील, प्राजक्ता पवार, रविंद्र अडसूळ आणि वाचक वर्ग उपस्थित होता.














