Spread the love

 

शाहूनगर , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शाहूनगर (चिंचवड) येथील श्री. शाहू वाचनालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक अधाटे गुरुजी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल, सल्लागार सोमनाथ कुईटे, रवींद्र पाटील आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

अधाटे गुरुजी यांनी बाबाहेबांच्या जीवनातील प्रसंग सांगून भारताच्या संविधान निर्मिती साठी दिलेल्या योगदानाची महती सांगितली. उपेक्षितांच्या साठी मोलाचे कार्य करताना , स्वातंत्र्य-समता-बंधुता या त्रिसूत्री साठी आंबेडकरांनी केलेल्या कार्याविषयी उपस्थितांना अवगत केले.
मनीषा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र अडसूळ यांनी आभार प्रदर्शन केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version