शालेय विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) ; अजिंक्य प्ले स्कूल अय्यप्पा मंदिर जवळ राजगड कॉलनी संतोष नगर कात्रज पुणे येथील शालेय विद्यार्थ्यांना मोफत हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला मारुती पाटील मोटार वाहन निरीक्षक पुणे ,रहिमा मुल्ला मोटार वाहन निरीक्षक पुणे,दत्तात्रय शिंदे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पुणे या अधिकाऱ्यांनी हेल्मेट चे महत्व व रस्ता सुरक्षा चे महत्व उपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांना समजून सांगितले. या कार्यक्रमाला अजिंक्य प्ले स्कूल च्या मुख्याध्यापिका अल्पना पवार ,कल्पना थोरवे नगरसेविका पुणे, महानगरपालिका एडवोकेट संभाजी थोरवे ,मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे सुरज देवकर, पंढरी बुरघटे, संतोष कपटकर, बसंत कुमार भाटिया, ओंकार जाधव, गणेश बाजारे, चंद्रकांत माळवदे, अनिल भिसे, सुनील भिसे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कपटकर यांनी केले. आभार सुरज देवकर यांनी मानले.













