शांतीब्रह्मा श्री एकनाथ महाराज षष्ठी निमित्त किर्तन महोत्सव संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री ज्ञानदेव संगीत क्लासेस आयोजित शांतीब्रह्मा श्री एकनाथ महाराज षष्ठी निमित्त त्रिदिनी किर्तन महोत्सव संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजक संगीत विशारद श्री ह.भ.प. भागवत महाराज भाग्यवंत अध्यात्मभूषण महिला कीर्तनकार भाग्यश्रीताई भाग्यवंत यांच्या संकल्पनेतून प्रथम दिवसाचे कीर्तनरुपी सेवा ह.भ.प. चंद्रकांत महाराज यादव त्याचबरोबर द्वितीय दिवसाची कीर्तनसेवा ह.भ.प. संतोष महाराज कौठाळे आणि काल्याचे किर्तनरुपी सेवा ह.भ.प.श्री.प्रेमानंद महाराज शास्त्री यांचे झाली.
याप्रसंगी आळंदीतील समस्त वारकरी दिगज कलाकार मित्रपरिवार उपस्थित होते. त्याचबरोबर ज्ञानदेव संगीत क्लासेस मधील सर्व साधक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित राहून भजन सेवा आणि हरीपाठ संपन्न झाला.
आळंदी पंचक्रोशी व इतर परिसरातील माननीय दिग्गज वरिष्ठ मंडळी यांनी सहकार्य करुन अनेक क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली याप्रसंगी अनेक उपक्रम घेण्यात आले . एकनाथ महाराजांची षष्ठी ज्ञानोबारायांच्या अलंकापूरीनगरीमध्ये सुंदर अशी कालाष्टमी सोहळा संपन्न झाला.













