ताज्या घडामोडीपिंपरी

शहर सल्लागार समितीची १४ वी बैठक संपन्न

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शहर सल्लागार समितीची स्थापन करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत शहराच्या विकास कामांचे अनुषंगाने शहर सल्लागार समितीची चौदावी बैठक गुरूवार, दि. २२ रोजी आयुक्त यांचे दालनात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शहरातील सूरू असलेल्या विविध विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आल्या. आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

यावेळी, खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे, चिंचवड विधानसभा आमदार अश्विनी जगताप, पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे (ऑनलाईन), शहर अभियंता मकरंद निकम, सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, जनरल मॅनेजर (इन्फ्रा) मनोज सेठिया, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, निमंत्रित सदस्य गोविंद पानसरे, अमित तलाठी, सिटीझन फोरम अध्यक्ष तुषार शिंदे, विद्यार्थी प्रतिनिधी दिपक पवार यांच्यासह सल्लागार कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच, स्मार्ट सिटीची कामगीरी, मिळालेले पुरस्कार त्याचबरोबर प्रकल्पांच्या विकासाबाबत सल्लागार प्रतिनिधी यांनी पीपीटीव्दारे सादरीकरण केले.

बैठकीत खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप यांनी स्मार्ट वॉटर मीटर, जीआयएस प्रकल्प, सीसीटीव्ही कॅमेरे, सिटी नेटवर्क, पार्किग व्यवस्था, पाण्याचे नियोजन, मनपा शाळांच्या विकासाबाबत चर्चा करून सूचना केल्या.

स्मार्ट सिटी प्रकल्पांची माहिती देताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले की,  शहरातील नागरिकांच्या सूरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येत असून दोन प्रकारचे सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. यामध्ये ३० दिवसांचा डाटा साठविता येतो, पोलीसांच्या मागणीनुसार डाटा उपलब्ध करून देण्यात येतो. स्मार्ट वॉटर मीटरद्वारे काही प्रमाणात पाणी गळती रोखण्यास मदत होत आहे. शहराच्या पार्किंगबाबत वारंवार पोलीस आयुक्त यांचे सोबत चर्चा सूरू आहे. इ- सर्व्हेलन्स हा प्रकल्प अत्यंत नाविन्य पूर्ण असून त्याद्वारे रस्त्यांवरील वाहनांवर नजर ठेवण्यात येत आहे. जीआयएस प्रकल्पाद्वारे लिडार च्या माध्यमातून शहरातील उंच इमारती, रस्त्यांचे मोजमाप, बांधकाम यांची माहिती संकलित करून यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. मनपाच्या बांधकाम विभागास याचा फायदा होणार आहे. तसेच, १ एप्रिल पासून मनपाच्या विभागांमध्ये जीआयएस प्रकल्प सूरू होणार आहे. ई-क्लास रुम प्रकल्प अंतिम टप्प्यात असून सध्या एआय वर काम केले जात आहे. शाळांमध्ये क्रीडा शिक्षक, समुपदेशक यांचा सहभाग असून शिक्षकांच्या प्रशिकांवर भर देण्यात आला आहे. शहरातील ६० पैकी ५८ व्हीएमडी कार्यरत आहेत.

सिटी नेटवर्कचे काम पूर्णत्वावर आहे. शहरातील स्मार्ट पार्किंग लवकरच प्रकल्प पूर्ण होईल. स्मार्ट पर्यावरण, स्मार्ट वॉटर, स्मार्ट सेव्हरेज, सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प देखील प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगी, उपस्थित सदस्यांनी देखील आपल्या सुचना मांडल्या. कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार यांनी आभार मानून बैठकीचा समारोप करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button