शहर काँग्रेसच्या दिवाळी फराळ स्नेह मेळाव्यात महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिवाळीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे होत असलेल्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित दिवाळी फराळ व स्नेह मेळाव्याचे आयोजन आकुर्डी येथील हॉटेल किरीयाड या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
शहर काँग्रेसने आयोजित केलेल्या मेळाव्यात पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड, पिंपरी व भोसरी या तिन्ही मतदारसंघात दिलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राहुल कलाटे, श्री अजित गव्हाणे, सौ सुलक्षणा शीलवंत-धर हे उपस्थित होते. पिंपरी, चिंचवड, भोसरी परिसरातील पदाधिकारी आणि नेते यांचा आयोजित केलेल्या मेळाव्यात शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम हे आपल्या मनोगतात म्हणाले की, लोकसभेला देखील काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या सोबत प्रचारामध्ये आघाडीवर राहिला आहे आणि आता देखील तिन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्ष प्रचारांमध्ये सक्रिय राहील व महाविकास आघाडीला जिंकवण्यासाठी राज्यात सरकार बदलवण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता काम करेल असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास संग्राम तावडे, विष्णुपंत नेवाळे, श्यामला सोनवणे, बिंदू तिवारी, तानाजी काटे, भाऊसाहेब मुगुटमल, किशोर कळसकर, अमर नाणेकर, वाहब शेख, मयूर जयस्वाल, ॲड. अनिरुध्द कांबळे, अबूबकर लांडगे, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, जार्ज मॅथ्यू, शहाबुद्दीन शेख, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, गौरव चौधरी, प्रा.किरण खाजेकर, दाहर मुजावर, अमरजीतसिंग पोथीवाल, जय राऊत, पराग भुजबळ, सचिन कोंढरे पाटील, वकीलप्रसाद गुप्ता, बाबासाहेब बनसोडे, निर्मला खैरे, अर्चना राऊत, स्मिता पवार-मुलाणी, प्रियंका कदम, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, सीमा यादव, नूतन शेळके, महेश पाटील, गणेश गरड, निखिल भोईर, चंद्रशेखर जाधव, राहुल शिंपले, मिलिंद फडतरे, दीपक श्रीवास्तव, दीपक भंडारी, मकरध्वज यादव, ॲड. गोपाळ गुणाले, ॲड. संतोष जाधव, राजन नायर, जमील औटी, हर्षद ओव्हाळ, विशाल कसबे, सतीश भोसले, वसंत वावरे, रशिद अत्तार, संदेश बोर्ड, रवींद्र कांबळे, सचिन गायकवाड, ॲड. मोहन अडसूळ, गौतम ओव्हाळ, सचिन नेटके, संदीप शिंदे, ॲड. प्रथमेश कांबळे, ॲड. अथर्व वाघमारे, आकाश शिंदे, योगेश बहिरट, युनूस बागवान, फिरोज तांबोळी, संगम गंगापुरे, सुरज कोथिंबीरे, बाबा वाघमारे, इरफान शेख, विशाल गरुड, मेहबूब शेख, साजिद खान, चंद्रशेखर लोणकर, रोहित शेळके, दीपक जाधव व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होतेच दिवाळी फराळाचा आनंद घेत सर्वांनी एकमेकास दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांनी उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा देत कार्यक्रम संपन्न झाला.












