ताज्या घडामोडीपिंपरी

शहर काँग्रेसची आढावा बैठक व पदाधिकारी मेळावा संपन्न

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यामध्ये संघटना बांधण्याच्या हेतूने जिल्हास्तरावर ब्लॉक बैठक व मेळावे घेण्यात आले, याचाच भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक १०/४/२०२५ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पिंपरी येथे भोसरी, चिंचवड, पिंपरी, या तीन ब्लॉकची आढावा बैठक व पदाधिकारी मेळावा घेण्यात आला. मेळावा संपल्यानंतर निरीक्षकांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक चर्चा केली.

पिंपरी चिंचवड शहराला निरिक्षक म्हणून आलेले श्री. प्रफुल्ल गुडदे पाटील हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा हरियाणा राज्याचे प्रभारी आहेत. ते नागपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत, त्यांनी विधानसभा निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढविलेली आहे.

ब्लॉक आढावा बैठकीत शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी व पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप यांनी आपल्या विभागाचा कार्य अहवाल निरीक्षक प्रफुल्ल गुडदे पाटील यांच्याकडे सुपूर्त केला व विभागाची संघटनात्मक माहिती दिली तसेच ब्लॉक पदाधिकाऱ्यांनी संघटने विषयक आपले मनोगत व्यक्त केले.

शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी तानाजी काटे, भाऊसाहेब मुगुटमल, राजाराम भोंडवे, लक्ष्मण रुपनर, अभिमन्यु दहितुले, भास्कर नारखेडे, रवि खन्ना, शौकत अली यांचा पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह, पुस्तक देऊन निरीक्षक प्रफुल्ल गडदे पाटील यांच्या शुभहस्ते कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच भुपेंद्र तामचिकर, इकबाल खान, हजरत भाई पटेल, सचिन नागणे, रितेश खुडे, महेश भालेराव यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

पक्षाच्या स्थानिक नेतेमंडळींनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आवश्यक कामाबाबत आपले विचार व्यक्त केले. यावेळी निरीक्षक प्रफुल्ल गडदे पाटील यांनी राष्ट्रीय स्तरावरून ज्या पद्धतीने पक्ष संघटनेमध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचं कार्य सुरू आहे. त्यासाठी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वच जिल्ह्यांमध्ये निरीक्षक नेमले आहेत व त्या निरीक्षकांच्या मार्फत जिल्ह्याचा कार्याचा आढावा घेतला जाणार आहे, त्याचाच भाग म्हणून आज मी इथे आले आहे, असे त्यांनी सांगितले. शहर काँग्रेसची संघटना यापुढे आणखीन मजबूत करण्यासाठी व शहर काँग्रेसला पुन्हा सोन्याचे दिवस कसे आणता येईल याबद्दल काही प्रमुख सूचना करण्यात आल्या.
पक्ष संघटन ब्लॉक स्तरावर भक्कम करून महापालिकेत सदस्य निवडून आणण्यासाठी विशेष मोहीम राबवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले, पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेसचा मतदार हा मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याला पोहोचण्यासाठी कार्यक्रम दिला जाईल, त्यावर प्रदेश व राष्ट्रीय स्तरावरून विशेष लक्ष असणार आहे, यापुढे जिल्हाध्यक्षांना सर्वस्व अधिकार राहणार असून त्यांच्या शिफारसी नुसारच नियुक्त्या तसेच तिकीट वाटप शिफारस होणार आहेत आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी यापुढे पक्षशिस्त लक्षात घेऊन कुठेही पक्ष संघटनेच्या शिस्तीचा भंग होणार नाही याची काळजी घेऊनच कार्य करावे. सर्वांनी जर मिळून एकत्र येऊन पक्षाला उभारी देण्याचे काम केले तर महापालिकेमध्ये चांगल्या संख्येने सदस्य निवडून येतील. पक्ष संघटना मजबूत करण्याकरिता दरमहा बैठका होणार असून त्याचा अहवाल राष्ट्रीय स्तरापर्यंत जाणार आहे. त्यामुळे प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भविष्यात चांगली संधी आहे.

भारतीय जनता पक्ष सारख्या जातीय शक्तीच्या विरोधात लढण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे, राजकारण व समाजकारण हे एकत्रित करण्याची हीच ती वेळ आहे, पक्ष संघटनेचे काम करता करता देश सेवेचे मोठे कार्य करण्याची देखील संधी आहे अशाप्रकारे गुडदे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम, अशोक मोरे, श्यामला सोनवणे, बिंदू तिवारी, बाबू नायर, विष्णुपंत नेवाळे, तुकाराम भोंडवे, विश्वास गजरमल, गौतम आरकडे, किशोर कळसकर, मनोज कांबळे, अमर नाणेकर, वाहब शेख, सायली नढे, कौस्तुभ नवले, मयूर जयस्वाल, ॲड.अनिरुध्द कांबळे, अबूबकर लांडगे, प्रा.किरण खाजेकर, दाहर मुजावर, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, जार्ज मॅथ्यू, शहाबुद्दीन शेख, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, गौरव चौधरी, केनिथ रेमी, तुषार पाटील, अमरजीतसिंग पोथीवाल, सचिन कोंढरे पाटील, ॲड.उमेश खंदारे, मुन्साफ खान, बाबासाहेब बनसोडे, डॉ.मनिषा गरुड, निर्मला खैरे, प्रियंका कदम, सुप्रिया पोहरे, ज्योती गायकवाड, स्वाती शिंदे, प्रतिभा कांबळे–तायडे, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, बबिता ससाणे, संदेश नवले, उमेश बनसोडे, अशोक मंगल, महादेव वाळूंजकर, महेश पाटील, मकरध्वज यादव, विशाल कसबे, याकुब इनामदार, विशाल सरवदे, चंद्रकांत लोंढे, निखिल भोईर, चंद्रशेखर जाधव, विरेन्द्र गायकवाड, राहुल शिंपले, मिलिंद फडतरे, ॲड.अशोक धायगुडे, रवि नांगरे, दीपक भंडारी, सतीश भोसले, वसंत वावरे, विंजय ओव्हाळ, झेविअर ॲथनी, सचिन गायकवाड, ॲड.मोहन अडसूळ, गौतम ओव्हाळ, साजिद खान, आकाश शिंदे, योगेश बहिरट, युनूस बागवान, ॲड.अनिकेत रसाळ, पांडुरंग जगताप, गुंगा क्षीरसागर, फिरोज तांबोळी, सुरज कोथिंबीरे, आनंदा फडतरे, चंद्रशेखर हौन्शाळ, बसवराज शेट्टी, प्रवीण कांबळे, अमजत शेख, गौतम धिवार, दत्ता पवार, विशाल शेलार, अमित मोरे, प्रथमेश विटकर, गणेश बंदपट्टे, रवि कांबळे, साहिल पवार वगैरे मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button