ताज्या घडामोडीपिंपरी

शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटवा – धम्मराज साळवे

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटवण्यात यावेत , अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (aimim )पक्षाचे धम्मराज साळवे यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घाटकोपर (मुंबई) येथील होर्डिंग्ज कोसळल्याच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे मागील काळात रावेत याठिकाणी घडलेली होर्डिंग दुर्घटना ,पुणे येथे घडलेली होर्डिंग दुर्घटना यांची पुन्हा वेळीच दखल घेणे गरजेचे आहे ..मोशी येथे अधिकृत असणारा होर्डिंग स्ट्रक्चर देखील जाहिरातदाराच्या निष्काळजीपणामुळे आणि आपल्या विभागाच्या दुर्लक्षामुळे वादळवाऱ्याने पडला .

जाहिरात फलकाचा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र आकाशचिन्ह व परवाना विभागास सादर करणे बंधनकारक आहे. जाहिरात फलकाना ज्या संरचना अभियंताने प्रमाणपत्र दिलेले आहे, त्यापैकी एखादे जाहिरात फलक कमकुवत आढळले किवा फलक पडून काही जीवित, वित्तहानी झाल्यास संबंधित संरचना अभियंतास जबाबदार धरण्यात यावे व त्यानुसार कारवाई करण्यात यावे .

मान्सूनपूर्व कालावधीत दुर्घटना व जीवितहानी टाळण्यासाठी योग्य योजना करणे आवश्यक आहे, जाहिरात फलकांचे रचनात्मक तपासणी करण्यात यावी, तपासणीअंती आढळून आलेले अवैध जाहिरात फलक निष्कासनाची कार्यवाही करून संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस व नजिकच्या मान्सून हंगामात पडणा-या पावसाची शक्यता विचारात घेऊन जीवित, मालमत्तहानी ,वाहतूक अडथळा होऊ नये, याकरिता परवानगी देण्यात आलेल्या सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट पुन्हा नव्याने करून घेण्यास संबंधित होर्डिंग्जमालकांना कळवून त्याप्रमाणे ऑडिट केल्याचा दाखला १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना कराव्यात. आपल्या हद्दीतील स्ट्रक्चरल ऑडिट न केलेल्या सर्व होर्डिंग्ज अनधिकृत समजून संबंधित अधिकारी यानी होर्डिंगधारकास नोटीस देऊन तात्काळ काढून टाकण्याची कार्यवाही करावी, अनधिकृत हॉर्डिंग्ज वर सक्त कारवाई करण्यात यावी. प्रामुख्याने धोकादायक वाहतूक अडथळा ठरणा-या होर्डिंग्जवर तातडीने कारवाई करावी,अधिक गर्दी असलेले ठिकाणी असणारे होर्डिंग हटवण्याचा प्रयत्न करण्यात यावे .

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आणखी २०६, होर्डिंग्ज अनधिकृत आहेत, त्या होर्डिंग्जमालकांनी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे अर्ज केले असून त्या होडिंग्जचे अद्याप नियमितीकरण झालेले नाही, तसेच शहरातील होर्डिंग्ज मालकांनी आपले स्ट्रक्चर कमकुवत असेल तर ते त्वरित हटवण्यात यावे, जर वादळ वारा जोरदार पावसाने होर्डिंग्ज स्ट्रक्चर पडून जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्याला जाहिरात फलकधारकास व महानगरपालिका आकाशचिन्ह परवाना विभाग अधिकारी जबाबदार राहतील याची आपण नोंद घ्यावी .
तरी  याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ १५ दिवसांच्या आत अनधिकृत व कमकुवत झालेले होर्डिंग्ज काढून घेण्याचे आदेश देण्यात यावेत , असे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button