चिंचवडताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

शहर भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते ॲड. मोरेश्वर शेडगे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीवर नियुक्ती

Spread the love

 

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेले अनेक वर्षे पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीसाठी प्रामाणिकपणे काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे ॲड. मोरेश्वर शेडगे यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीवर आज नियुक्ती करण्यात आली.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोरेश्वर शेडगे यांना प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्त करण्यात आल्याचे पत्र आज सुपूर्द केले.

ॲड. मोरेश्वर शेडगे हे गेली अनेक वर्षे पिंपरी चिंचवड शहरात पक्ष हितासाठी व पक्षाच्या बांधणीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. अनेकदा त्यांना संधी असतानाही केवळ पक्ष हितासाठी म्हणून त्यांनी अनेक व्यक्तिगत त्याग केले आहेत. पक्षासाठी म्हणून अहोरात्र प्रयत्नशील असणारे मोरेश्वर शेडगे यांना प्रदेश कार्यकारणीवर घेऊन भारतीय जनता पार्टीने काहीअंशी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

थोडक्यात परीचय
_भारतीय जनता पक्षाच्या स्थापने पासून मोरेश्वर शेडगे यांचे वडील ज्ञानेश्वर शेडगे व चुलते शिवाजी शेडगे हे पक्षसंघटनेचे कार्य करीत आहेत.
_ॲड. मोरेश्वर शेडगे हे बालपणा पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून संघदृष्ट्या प्रथम वर्ष शिक्षित आहेत. महाविद्यालयीन जीवनात आखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचे 5 वर्षे सक्रिय कार्य केले आहे.
_ॲड. मोरेश्वर शेडगे हे २००२ पासून म्हणजे गेल्या २१ वर्षांपासून पक्षाचे पूर्णवेळ सक्रिय काम करित आहेत.
२००२ मध्ये भाजप युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष, २००३ मधे भाजप युवा मोर्चा मंडल अध्यक्ष, २००६ मधे भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड संघठन सरचिटणीस, २००९ मधे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष, २०११ भाजयुमो प्रदेश सचिव, २०१३ मधे भाजयुमो पिंपरी चिंचवड जिल्हाध्यक्ष व २०२० मधे भाजपा पिं.चि. जिल्हा महामंत्री या क्रमाने पक्षाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
_यात विशेष बाब म्हणजे ॲड.मोरेश्वर शेडगे भाजपा युवा मोर्चाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष असतांना त्यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार व महापालिकेतील भ्रष्टाचारा विरोधात केलेली आंदोलने प्रचंड गाजली आहेत.

लोकसभा, विधानसभा व महानगरपालिका निवडणूका असो किंवा पुणे विद्यापीठ सिनेट निवडणूका असो या सर्व निवडणूकांमधे पक्षाच्या अनेक महत्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडल्या आहेत.

२०१४ मधे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधना नंतर विधानसभा निवडणुंका आधी आ.पंकजाताई मुंडे यांनी काढलेल्या ‘पुन्हा एकदा संघर्ष यात्रेत ॲड. मोरेश्वर शेडगे पुर्णवेळ सहभागी होते व त्यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती.
_२०१९ मधे तात्कलीन मुख्यमंत्री  महाजनादेश यात्रेत पुर्णवेळ सहभाग घेऊन अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button