ताज्या घडामोडीपिंपरी

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार  यांच्या हस्ते प्रशांत  सपकाळ फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण  शरद पवार  यांच्या हस्ते सांगवी येथील गोल्डमॅन प्रशांत  सपकाळ फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी – चिंचवड शहराध्यक्ष  तुषार कामठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस  प्रशांत सपकाळ, माजी नगरसेविका  सुलक्षणा शीलवंत, प्रीती तापकीर, अक्षय महाजन, रोहन सावेकर, मयूर महाजन, प्रथमेश भांबरे, संदीप महाजन, आकाश जाधव, अमित कुंभार, हर्षल नानवरे आदी उपस्थित होते.

यावेळी  शरद पवार  आकर्षक रंगसंगती व अनेक सामाजिक संदेशांनी प्रकाशित केलेल्या या दिनदर्शिकेचे कौतुक करत प्रशांत दादा सपकाळ फाउंडेशनच्या माध्यमातून सांगवी, नवी सांगवी व पिंपळे गुरव या परिसरामध्ये युवाशक्तीला बळ देत करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल मा. प्रशांत सपकाळ यांना शाबासकीची थाप दिली.
प्रशांत  सपकाळ यांनी सर्वसामान्यांना विविध सण, उत्सव, समारंभ त्याचबरोबर वार्षिक सुट्टयांचे नियोजन करण्यासाठी ही दिनदर्शिका उपयुक्त पडणार असल्याचे नमूद केले.

विशेषतः   प्रशांत  सपकाळ हे स्वतः सदर दिनदर्शिका सांगवी व पिंपळे गुरव परिसरामध्ये घरोघरी जाऊन मोफत वाटप करत असून या सामाजिक कार्याबद्दल जनतेतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button