चिंचवडताज्या घडामोडी

शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तोफ धडाडणार

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा आज (दि. १६ ) भूमकर चौक येथील द्रौपदा लॉन्स याठिकाणी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.

या सभेला चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले) यांच्यासह मित्रपक्ष महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या सभेसाठी महायुतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून चिंचवड मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीच्या मुख्य समस्येवर या सभेत नितीन गडकरी काय बोलणार याकडे चिंचवडकरांचे लक्ष असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button