चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

व्यक्तीमत्व सुदृढ, ठेवण्यासाठी लवचिकता अंगीकारती व्याख्याते –  डॉ. संतोष भावे

Spread the love

 


चिंचवड ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –
 येथील कमला एज्युकेशन सोसायटिच्या प्रतिभा इन्स्टिट्यूशन्स आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट पुणे शाखा याच्या संयुक्त विद्यमाने संसाधन विभागातील समुहातील अधिकार्‍यासाठी महाविद्यालयात औद्योगिक कार्य वातावरणातील कर्मचार्‍यांमध्ये लवचिकता या विषयावर भारत फोर्ज कंपनीतील मानव संसाधन विभागाचे संचालक डॉ. संतोष भावे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी  विविध उद्योग समुहातील सुमारे 140 हून मानव संसाधन उपस्थित होते.

प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सने नुकतेच सुरू केलेल्या प्रतिभा कौशल्य विकास केंद्र व प्लेसमेन्टची माहीती उद्योगजगतात व्हावी यासाठी ‘एच आर समिट’ या उपक्रमाचे उद्घाटन व्याख्याने डॉ. संतोष भावे व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट पुणे शाखेचे अध्यक्ष कल्याण पवार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरती संस्थेचे सचिव डॉ. दिपक शहा, एम.बी.ए.चे संचालक डॉ. सचिन बोरगांवे, मुख्य प्रशासुकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया प्लेसमेंट प्रमुख डॉ.हर्षिता वाच्छानी, एन.आय.पी.एम.च्या सदस्या वहीदा पठाण, मनीषा खोमणे, सायबर सिक्यूरीटेचे प्रेम मेहता, प्रतिभा  स्कील डेव्हलपमेंट चे संचालक अरुण जंगम, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी उपास्थित होते.

व्याख्याते डॉ. संतोष भावे मागदर्शन करताना पुढे म्हणाले, क्षेत्र कोणतेही असो लवचिकता ही प्रत्येकांच्या व्यक्तीमत्वामध्ये  ही आवश्यक बाब आहे मग तो प्राध्यापाक, उदयोजक, औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी असो प्रत्येकजण हा चूक करीतच असतो त्यांनी चूक केली तर त्याच्यामध्ये बरोबर काय आहे हे चार जणात चर्चा करणे आवश्यकच आहे. व्यक्तीगत तो काम करू शकत नाही, त्याला त्याच्या समुहामध्ये दैनंदिन काय काम करायला हवे होते? काय केले? यावर सखोल चर्चा केली तर यात लवचिकता जी आहे. त्यातील ताठरता जावून त्याच्या व्यक्तीमत्वामध्ये लवचिकता येईल, ताठरता आली तर मी म्हणतो तेच खरे त्यामध्ये दुसर्‍याची बाजू आपल्याला समजून घेता येत नाही. आर्थिक दृष्टीने, औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने, तांत्रिक दृष्टीने आपल्यात जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व एक कौटुंबिक व्यक्तिमत्व असते व दुसरे व्यावसायिक व्यक्तिमत्व असते जर कौटुंबिक व्यक्तिमत्व तुमचे चांगले असेल तर तुम्हाला व्यावसायिक व्यक्तिमत्वामध्ये जास्त गोष्टी शांतपणाने अंगीकारता येतात व्यवसायिक दृष्टिकोनातून तुमचे व्यक्तिमत्वे जर सुदृढ राहीले तर कुटुंबामध्येही जास्तीत जास्त चांगल्या रीतीने स्थिरस्थावर होऊ शकता हे लवचिकता या गुणवत्तेमध्ये आवश्यक गुण आहे.
एन.आय.पी.एम. पुणे शाखेचे कल्याण पवार म्हणाले, आमची संस्था राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून देशभरात याचे 54 शाखा कार्यरत आहेत. याद्वारे औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात समन्वय साधण्याच्या सातत्याने प्रयत्न केला जातो वेळोवेळी विद्यार्थी, औद्योगिक मानव संसाधनातील अधिकारी यांना विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवरच्याकरवी वेळोवेळी मार्गदर्शन, प्रशिक्षण, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व एन.आय.पी.एम. यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात या कार्यक्रमाद्वारे समन्वय साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा आपल्या मनोगतात म्हणाले महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान दिले जाते विविध शाखेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच औद्योगिक ते समूहात चालणार्‍या कामकाजाबाबत प्रत्यक्ष कृतीरूपी ज्ञान कुशल व्यक्तीमार्फत प्रशिक्षण मिळाले तर उद्योग जगतात आपण वेगळा ठसा निर्माण करू शकतील, रोजगार मिळेल. यासाठीच प्रतिभा स्किल डेव्हलपमेंट सेंटर ची निर्मिती केली आहे. येथे कुशल तज्ञाकरवी बेसिक इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स सेन्सर्स, ऑटोमेशन सायबर सिक्युरिटी आदी कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येते. उद्योग समूहाच्या गरजेनुसार तयार कुशल कर्मचारी वर्ग तयार व्हावा हा हेतू आहे डेव्हलपमेंट सेंटर मध्ये सर्व अत्यावश्यक सुविधा देखील उपलब्ध करण्यात आल्या आहे. उद्योग समूहातील मानव संसाधन विभाग अत्यंत महत्त्वाचे असून येथे काम करताना त्यांना दैनंदिन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चाकोरीबद्दल काम करत राहिलो तर, अपेक्षित यश साध्य करता येत नाही अनेकदा काम करणार्‍या कर्मचारी वर्ग इतर घटकांच्या भावनांच्या मनातील कल्पना जाणून घेऊन निर्णय घ्यावे लागतात शिस्त महत्त्वाची आहे प्रसंगी त्यात लवचिकता आणून निर्णय घेतले तर उद्योग समूहात भरभराट होते. यासाठीच डॉ. संतोष भावे यांचे लवचिकता या विषयावर व्याख्यान आयोजित करून उद्योग समूहातील मानव संशोधन विभागातील कार्यरत अधिकार्‍यांसमवेत स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल कमला एज्युकेशन सोसायटी आभारी आहे .

संस्थेचे सीईओ डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी संस्थेचे संपूर्ण माहिती विशद केली एमबीएचे संचालक डॉ. सचिन बोरगांवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांची प्लेसमेंट विभागाच्या डॉ.हर्षिता वाच्छांनी, डॉ.महिमा सिंग यांनी केले सूत्रसंचालन हर्षिता लोहाने, अंजली वचने यांनी केले तर आभार वहिदा पठाण यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. हर्षिता वाच्छानी, ज्योत्स्ना सुमन, तुषार काळे, शंकर जाधव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button