वेणुनगर ज्येष्ठ नागरिक संघ वाकड येथे १५ ऑगस्ट निमित्त ज्येष्ठ नागरिकांकरिता कॅरम स्पर्धेचे आयोजन

माजी नगरसेवक ॲड.विनायक रमेश गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करीत स्पर्धेस सुरुवात
वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड परिसरात वेणुनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठांसाठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आज ह्या कॅरम स्पर्धेचे मा.नगरसेवक ॲड.विनायक रमेश गायकवाड ह्यांनी उद्घाटन करीत सामन्यांची सुरुवात केली. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत, यामध्ये एकेरी व दुहेरी स्पर्धा असणार आहेत. वेणुनगर ज्येष्ठ नागरिक सघ यांच्यावतीने ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. ह्या स्पर्धेस ज्येष्ठ सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ५० स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे. १४ ऑगस्ट पर्यंत ह्या स्पर्धा असून १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनी आतीम सामना असेल.
ह्यावेळी वेणुनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर राहटे, उपाध्यक्ष राजेंद्र बडगुजर, उपाध्यक्ष बी.आर.पाटील व सर्व सभासद आणि नागरिक उपस्थित होते.













