ताज्या घडामोडीपिंपरी

वूई टुगेदर फाउंडेशन,मधुकर बच्चे युवा मंच व गणेश वाळुंजकर मित्र परिवार यांच्या वतीने पिंपरी गावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा नुकताच पंढरपूर कडून परत देहूकडे आला.वारकऱ्यांना पालखी परतीच्या वेळी आरोग्याच्या अनेक समस्या जानवतात म्हणूनच पिंपरी गावांत पालखी सोहळा मुक्कामी आली असता पालखीतील वारकरी व भाविकांचे आरोग्य योग्य राहावे त्यांची आरोग्य सेवा घडावी या साठी वूई टुगेदर फाउंडेशन,मधुकर बच्चे युवा मंच व गणेश वाळुंजकर मित्र परिवार यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक पिंपरी गाव येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबीर घेण्यात आले.

शिबिरात सर्व प्रकारचे साथीचे आजार,शुगर,बीपी,आदी महत्वाच्या आजारावर वारकऱ्याची तपासणी करून आवश्यक औषधे देण्यात आली.या शिबिरात वारकरी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

आयोजकांच्या वतीने तीन डॉ. चार फार्मासिस्ट,20 स्वयंसेवक,तसेच संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते वारकऱ्याच्या सेवेसाठी मोठ्या संख्येने सहभागी होते
डॉ. मोहन काळे,मा.उपमहापौर प्रभाकर वाघेरे व मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन केले.
संस्थेचे अध्यक्ष,सलीम सय्यद, गणेश वाळुंजकर,महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य,वूई टुगेदर फाउंडेशनचे सल्लागार, मधुकर बच्चे,
मधुरा दाते, मंगला सपकाळे- डोळे, सोनाली महाजन,अनिता वाळुंजकर ,गणेश ढाकणे ,किशोर उदास वसंत ढवळे ,कैलास सानप हणमंत घुगे संतोष वाघेरे दिगंबर वाघेरे दारासिंग महाजन,
श्रीरंग दाते, सदाशिव गुरव, जयंत कुलकर्णी, विलास गटणे, विलास जगताप, दिलीप पेटकर,
आकाश खिल्लारे,आदिनी शिबीरात् पूर्णवेळ सहभाग घेतला.

मोरया फार्मा चे मारुती हाके,पियुष गुप्ता,चैतन्य फार्माचे गणेश बच्चे,पोपट बच्चे,अक्षय गारगोटे,रोहिणी बच्चे आदिनी शिबिरातील साहित्याची मोठी मदत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button