वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथे शिवजयंती साजरी

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने काकडे पार्क चिंचवड येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून विधिवत पूजन करण्यात आले.फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी छत्रपती शिवराय यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले व वूई टुगेदर फाउंडेशन विषयी उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली.
वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक वर्षी शिवजयंतीला वेगळा उपक्रम घेतला जातो या वर्षी गडकिल्ले संवर्धन,इतिहास जपणारे,व श्यक्य तेवढा शिवराय,संभाजी राजे, यांचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणारे,तसेच जेष्ठ नागरिक यांचा शाल,श्रीफळ,फुले देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी वूई टुगेदर अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सामूहिक शिव वंदना व घोषणा देण्यात आल्या.
राष्ट्रजागर प्रतिष्ठानचे राहुल ताम्हणकर, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रजागर प्रतिष्ठान कायम गडकिल्ले संवर्धन व ऐतिहासिक माहिती अनेकांना देतात म्हणून या प्रतिष्ठांनचा विशेष सत्कार करण्यात आला.
उत्तम विटुळे,सखाराम देशपांडे,आहिरे काका,विद्याधार देशपांडे,अशोक सोलणकर,मच्छिन्द्र थोरवे, मोरेश्वर देशपांडे,पांडुरंग कुलकर्णी, काशिनाथ देव,मिलिंद इनामदार , मोरेश्वर देशपांडे मान्यवरांना शिवजयंती निमित्त विशेष गौरव करण्यात आला.फाउंडेशन संस्थापक क्रांतिकुमार कडुलकर यांनी शिवराय विषयी आपल्या सुंदर मनोगतात थोडक्यात इतिहास सांगितला.
अध्यक्ष सलीम सय्यद,उपाध्यक्षा,सोनाली मन्हास,खजिनदार,दिलीप चक्रे,रवींद्र काळे,दारासिंह मन्हास,सदाशिव गुरव,सुरेंद्र जगताप,अनिल पोरे,विलास गटने,शंकर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
फाउंडेशन सचिव मंगला डोळे – सपकाळे,यांनी उपलब्ध करून दिलेले एनर्जी ड्रिंक( O R S) उपस्थित सर्वांना वाटप करण्यात आले.उपाध्यक्षा सोनाली मन्हास यांनी सूत्रसंचालन केले.तर अध्यक्ष सलीम सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले.














