चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

वूई टुगेदर फाउंडेशनच्यावतीने शिवप्रेमी कलाकार प्रथमेश शिंदे याचा सत्कार

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रथमेश शिंदे नावाच्या शिवप्रेमी कलाकाराणे केशवनगर चिंचवड येथील गोयल कॉर्नर बिल्डिंगच्या उंच व अवघड जागी भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात मोठी पेंटिंग अतिशय खडतर परस्थितीत काढली आहे.
परिसरातून महाराजांची पेंटिंग पहाण्यासाठी मोठ्या प्रमानात नागरिक येत आहेत व खूप कौतुक करतात.
प्रथमेश याला आणखी ऊर्जा मिळावी म्हणून निस्वार्थी संस्था, वूई टुगेदर फाउंडेशन च्या वतीने त्याचा खूप आदरपूर्वक शाल श्रीफळ व बक्षीस असा सन्मान करण्यात आला व खूप कौतुक करण्यात आले.

या वेळी वूई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे,सलीम सय्यद,जयंत कुलकर्णी,दिलीप चक्रे,रवींद्र सागडे,मांडके काका,निवृत्त पोलीस शंकराव कुलकर्णी भाजपा प्रदेश सदस्य अजित कुलथे, अर्चना बच्चे,आदींनी माझा सत्कार केला .व अत्यन्त निस्वार्थी कौतुकाची थाप मारली,व भविष्यात काही मदत लागली तर फाउंडेशन व आम्ही व्यक्तिगत कायम पुढाकार घेऊ असे त्याला आश्वासन दिले.
प्रथमेश ची प्रतिक्रिया प्रथमेश सरस्वती दिनेश शिंदे. खरं तर खूप दिवसापासून माझी इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचे पेंटिंग करावे पण मला योग्य अशी जागा मिळत नव्हती. आणि शिवजयंती ही समोर होती
शेवटी मी ठरवले की आपल्याच बिल्डिंग च्या एका भिंतीवर पेंटिंग करावे गोयल कॉर्नर सोसायाटी मधुकर बच्चे यांचे जनसंपर्क कार्यालय समोर चिंचवड आणि या साठी मला सोसायटी ने परवानगी ही दिली. पण अत्यन्त अवघड व धोकादायक जागा मिळाली पण माझी श्रद्धा होती की मी पेंटिंग पूर्ण करू शकतो.
मग लगेचच मी पेंटिंग करायला सुरुवात केली. पण भिंतीची उंची खूप असल्या मुळे मला काम करणे अवघड जात होते. त्यामुळे मी जनसेवक मधुकर बच्चे सरांची मदत घेतली त्यांनी एक सामाजिक कार्य म्हणून आणि शिव प्रेमी म्हणून मला हायड्रॉलिक गाडी बोलाऊन दिली पण भिंतीची उंची आणि आजू बाजूला असणाऱ्या काही दुकानानं मुळे गाडी भिंती पर्यंत पोहोचू शकली नाही.तरीही बच्चे सरांनी पुन्हा एकदा दुसरी गाडी बोलाऊन प्रयत्न केला पण उंची पेक्षा आतील अंतर जास्त असल्यामुळे त्या गाडीचा प्रयत्न पण यशस्वी झाला नाही.आता माझ्या समोर एक मोठा प्रश्न होता की महाराजांचे पेंटिंग करायचे कसे मग मी लाकडी शिडीचा वापर करून पेंटिंग पूर्ण केली. पेंटिंग करायला शिडी व्यवस्थित लागत नव्हती ही अडचण सारखीच येत होती, पण जयंती समोर होती आणि मला ही पेंटिंग करायचीच होती म्हणून महाराजांची पेंटिंग पूर्ण केली. एक खास गोष्ट अशी आहे महाराजांच्या पेंटिंग ची की ही कलाकृती पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठी कलाकृती आहे उंची ३० फूट आहे.
आणि टेक्निकल सपोर्ट काही नसल्यामुळे
हे काम ३-४ दिवसांवर गेले पण जयंती च्या अगोदर च्या दिवशी अवघ्या ५ तासात ही कलाकृती पूर्ण झाली.
ही कलाकृती करण्याचा उद्देश माझा असा आहे की महाराजांकडे पाहताना एक पॉझिटिव एनर्जी यावी आणि माझी कला लोकांपर्यंत पोहोचावी.

सर्वात पहिली दखल घेणारी संस्था
निस्वार्थी संस्था वूई टुगेदर फाउंडेशन च्या वतीने माझा खूप आदरपूर्वक शाल श्रीफळ व बक्षीस असा सन्मान करण्यात आला व खूप कौतुक करण्यात आले.
या वेळी वूई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे,सलीम सय्यद,जयंत कुलकर्णी,दिलीप चक्रे,रवींद्र सागडे,मांडके काका,निवृत्त पोलीस शंकराव कुलकर्णी भाजपा प्रदेश सदस्य अजित कुलथे, अर्चना बच्चे,आदींनी माझा सत्कार केला .व अत्यन्त निस्वार्थी कौतुकाची थाप मारली,व भविष्यात काही मदत लागली तर फाउंडेशन व आम्ही व्यक्तिगत कायम पुढाकार घेऊ असे त्यांनी आश्वासन दिले.
जास्तीत जास्त नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य पेंटिंग पहाण्यास आवर्जून यावे अशी मी विनंती करतो.
सहकार्य केलेल्या सर्वांचा मी आभारी आहे..
प्रथमेश शिंदे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button