वूई टुगेदर फाउंडेशनच्या पुढाकाराने भारतीय सैनिकांसोबत रक्षा बंधन केले साजरे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय सैनिकांसोबत रक्षा बंधन करावे सैनिकांचा सहवास मिळावा,संवाद व्हावा अशी अभिसार फाउंडेशन संचलित वाकड येथील दिव्यांग शाळेतील मुलांची,पालकांची तसेच शिक्षकांची खूप इच्छा होती.त्यांनी हि इच्छा वूई टुगेदर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना बोलून दाखविली.
फाउंडेशनच्या माध्यमातून त्वरित आर्मी युनिट लायन्स खडकी येथील मिलेटरी वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधून वरील उपक्रम साठी सहकार्य करण्याची विनंती केली त्यांनीही त्वरित पाठपुरावा करून वरील उपक्रम घेण्याची परवानगी दिली.
अतिशय आनंदी वातावरणात हा रक्षाबंधन व संवाद उपक्रम पार पडला.
या उपक्रमासाठी वूई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष सलीम सय्यद,सल्लागार मधुकर बच्चे आदी पदाधिकार्यानी पुढाकार घेतला.कर्नल साहेब सह सर्व सैनिकांनी दिव्यांग मुले,पालक,शिक्षक, वूई टुगेदर फाउंडेशन पदाधिकारी,आदींचे अत्यन्त आदरपूर्वक स्वागत केले व अतिशय उत्तम कार्यक्रम आयोजित केला.
दिव्यांग मुले,पालक,शिक्षक,फाउंडेशन पदाधिकारी यांनी सर्व सैनिकांना औक्षण करून राखी बांधून तोंड गोड केले.
आर्मीच्या वतीने प्रशासकीय अधिकारी उज्व्वल खातेवाड,सुरक्षा अधिकारी, मेजर सुजित सिंग,अंतर्गत सुरक्षा अधिकारी संतोष दास,आणामिका सिंग आदी सहकाऱ्यानी आर्मीत कार्यक्रम करण्यास मोलाची मदत केली.
या वेळी वूई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष सलीम सय्यद,सल्लागार मधुकर बच्चे,सीता केंद्रे,मंगला डोळे – सपकाळे,सेक्रेटरी,जयंत कुलकर्णी,खजिनदार,दिलीप चक्रे,लायन्स क्लब अध्यक्ष,रवींद्र काळे,सदाशिव गुरव,रोहिणी बच्चे,माया सांगवे,वैशाली खेडेकर,अंजना शिगरे,विकास जगताप आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले.
दिव्यांग मुले पालक यांना या उपक्रमात् खूप आनंद मिळाला तसा त्यांनी आनंद व्यक्त केला.













