विश्वास गजरमल यांना समाजभूषण पुरस्कारने सन्मानित

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन व ऑल इंडिया वुमेन राइट्स असोशियन यांच्यातर्फे वर्ल्ड बेस्ट सिस्टर अवॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड दिनांक 10/08/24 रोजी ईस्ट कोर्ट फिनिक्स मॉल येथे आयोजित करण्यात आला होता.विश्वास गजरमल यांना समाजभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींना इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार 2024 ने गौरवण्यात आले .
त्यात मा,नगरसेवक विश्वास गजरमल यांना ते करत असलेले समाजकार्य या करिता पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती श्री मदन कोठुळे स्पोर्ट ऑर्गनायझर, बॉबी कारणानी अध्यक्ष वी एन डब्लू सी ग्रुप,श्री योगेश गोंदले चेअरमन सन्मित्र बँक, श्री सुनील हिरूरकर असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, कर्नल महादेव घुगे कर्नल, जयंत हिरे मॅनेजर आयसीआयसीआय बँक, आदी उपस्थित होते .हा कार्यक्रमाचा बहुउद्देशीय असा कि या कार्यक्रमामार्फत गोरगरिबांचे उपचारासाठी मेडी प्लस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गोरगरिबांसाठी मोफत इलाज करत असतात. त्यासाठी या हॉस्पिटलला 51 हजार रुपयांचा धनादेश चेक स्वरूपात डॉक्टर मंगेश शेंकार यांना देण्यात आला व आभार फिरोज खान अध्यक्ष साई सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने सर्व पुरस्कार व्यक्ती यांचे अभिनंदन करत या सर्वांचे कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले विश्वास गजरमल यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.









