ताज्या घडामोडीपिंपरी

विविध धार्मिक, वैचारिक कार्यक्रम आणि आरोग्य शिबिराने मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सांगता

Spread the love

चिंचवड, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात रविवारी (दि. 31) विविध धार्मिक, वैचारिक कार्यक्रम पार पडले. तसेच रविवारी झालेल्या आरोग्य शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेत आरोग्य तपासणी आणि दंत चिकित्सा केली.

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सवाचे यंदा 462 वे वर्ष आहे. संजीवन समाधी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी सहा वाजता नितीन दैठणकर आणि तुकाराम दैठणकर यांचे चौघडा वादन झाले. श्री गोंदवलेकर महाराज आरती मंडळाकडून रविवारी श्रींची महाआरती संपन्न झाली. त्यानंतर श्री मोरया गोसावी चरित्र पठण आणि वे.मू.श्री चंद्रशेखर रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री लक्ष्मी विनायक याग पार पडला. विद्या देव आणि नारायण लांडगे यांनी श्रीसूक्त पठण केले.

कै. शरद लुणावत यांच्या स्मरणार्थ निखील लुणावत यांच्यातर्फे आरोग्य व दंत चिकित्सा शिबीर घेण्यात आले. या शिबिरात शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणी केली. तसेच दातांची तपासणी केली. सायंकाळी लक्ष्मीप्रसाद शंकरराव कुलकर्णी यांचे कीर्तन संपन्न झाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सुनीलजी देवधर यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर पंडित श्रीधर फडके यांचा गीत रामायण हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. या गीत रामायणात भाविक रमून गेले, जय श्री रामाच्या च्या महितीने तल्लीन झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
mr Marathi