वाल्हेकरवाडी परिसरातील विद्युत कामे मार्गी लागणार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड वाल्हेकरवाडी परिसरातील विद्युत विषयक समस्या मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्याची यांची भेट घेऊन निवेदन दिले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य पुणे जिल्हा संतोष सौंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संदीप भालके, सुरज बराटे आदींनी महावितरण चे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्यासोबत बैठक घेतली.
वाल्हेकरवाडी चिंचवड येथील कृष्णाई कॉलनी आणि मोरया कॉलनी परिसरात गेल्या सात वर्षा पासून आम्ही या वीज वाहिन्या भूमिगत व्हाव्यात यासाठी पाठ पुरावा करत आहोत तरी देखील हि विद्युत विषयक कामे प्रलंबित आहेत. वेळोवेळी सूचना करूनही तेथील विद्युत विषयक समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याकडे महावितरण चे लक्ष वेधण्यात आले. याबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर महावितरण अधिकाऱ्यांनी पिपरीचे कार्यकारी अभियंता मुंडे यांना त्वरित काम मार्गी लावण्यासाठी सूचना केल्या असे ही निवेदनात म्हटले आहे.













