वानवडीत अनधिकृत हॉटेल, दुकानांवर फिरला बुलडोझर तक्रारी अर्जानुसार खाजगी जागेतील अतिक्रमणवर कारवाई

वानवडी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वानवडीत हॉटेल तसेच दुकानांवर पालिकेच्या मुख्य खात्याच्या बांधकाम विकास विभागामार्फत अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवत कडक कारवाई करण्यात आली.यावेळी जेसीबीच्या साहाय्याने पत्र्याचे शेड, बांधकाम असे एकूण७५०० चौ. फूट बांधकामपाडण्यात आले.
जगताप चौक येथून राज्य राखीव पोलिस दलाकडे जाणाऱ्यारस्त्याच्या बाजूला असलेल्या खासगी जागेत अनधिकृतपणे अतिक्रमण करून सुरू केलेल्या दडॉक हॉटेल, पुणेरी कट्टा, अलवान केटरर्स, स्टार चिकन आणि लोबोस ऑटोमोबाईल या दुकानांवर कारवाई करण्यात आली.
कारवाई करण्यात आलेली जागा खासगी असून ती
न्यायप्रविष्ट आहे. आलेल्या तक्रारी अर्जानुसार संबंधित हॉटेल व दुकानदारांना तीस दिवसांची नोटीस देण्यात आली होती.
पालिकेच्यावतीने असे पाडले हॉटेल.स्टे ऑर्डर येईपर्यंत ७५०० फुट पाडकाम कारवाई सुरु असताना दीड तासानंतर न्यायालयाची स्टे ऑर्डर आल्याने कारवाई थांबवण्यात आली.
तोपर्यंत जवळपास ७५०० चौ. फू. अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले होते. स्टे उठल्यानंतर पुन्हा कारवाई करण्यात येणार असल्याचे उपअभियंता विजय दाभाडे यांनी यावेळी सांगितले.













