ताज्या घडामोडीपिंपरी

वाकड येथील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष द्या विशाल वाकडकर यांची जनसंवाद सभेत मागणी

Spread the love

 

वाकड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात येत असलेल्या जनसंवाद सभेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल वाकडकर यांनी वाकड प्रभाग क्रमांक ३८ जुना प्रभाग २५ येथील समस्यांचा पाढा वाचला. तसेच अर्धवट विकासकामे त्वरित पूर्ण करा अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात नेहमीप्रमाणे सोमवारी जनसंवाद सभा पार पडली यावेळी मुख्य समन्वयक अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित तक्रारींचे निवारण करण्याच्या सूचना दिल्या.

विशाल वाकडकर यांनी वाकड येथील भूमकर चौक, भूमकर वस्ती , वाकडकर वस्ती, विनोदे वस्ती, भुजबळ वस्ती, डी पी रोड वाकड, काळाखडक येथील महापालिकेच्या वतीने सुरु असलेली कामे आणि त्याबाबत होत असलेली दिरंगाई आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास याबाबत विचारणा केली.

वाकड हिंजवडी नवीन लिंक रोड वरील रॉयल मिराज सोसायटीजवळील नवीन रस्त्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून पथदिवे नाहीत, त्याच रस्त्याच्या बाजूला ओपन जिम चे साहित्य लावले गेल्यास परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होईल.
वाकडकर वस्ती जवळून वाहणाऱ्या सार्वजनिक ओढ्यास संरक्षण भिंत बांधणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी सदरील काम करणे गरजेचे आहे हे संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
रॉयल ग्रँड सोसायटी जवळ मुख्य रस्त्याच्या कडेला असणारा राडारोडा तात्काळ उचलण्यात यावा. तसेच इंडस चॅम्प शाळेजवळ गतिरोधक बसविण्यात यावे.
वाकड दत्तमंदिर रस्त्याचे काम वेगाने होणे अपेक्षित आहे याबाबत ही विचारणा केली.

भूमकर चौकात सकाळी आणि सायंकाळी सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा. तेथील सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीने स्थानिक नागरिक तसेच आय टी पार्क हिंजवडी येथील नोकरवर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. भूमकर चौकातील अस्पष्ट व मोडकळीस आलेले फलक काढून त्याठिकाणी नवीन फलक लावण्यात यावे.

या व अशा अनेक समस्यांबाबत विशाल वाकडकर यांच्याकडून जनसंवाद सभेत विचारणा करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button